Bnss कलम ५५ : पोलीस अधिकारी वॉरंटाशिवाय अटक करण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्याला प्रतिनियुक्त करतो तेव्हाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५५ :
पोलीस अधिकारी वॉरंटाशिवाय अटक करण्यासाठी दुय्यम अधिकाऱ्याला प्रतिनियुक्त करतो तेव्हाची प्रक्रिया :
१) जेव्हा पोलीस ठाण्याचा कोणताही अंमलदार अधिकारी किंवा १३ व्या प्रकरणाखाली अन्वेषण करणारा कोणताही पोलीस अधिकारी, जिला वॉरंटाशिवाय वैधपणे अटक करता येईल अशा कोणत्याही व्यक्तीला वॉरंटााशिवाय ( आपल्या समक्ष नव्हे) अटक करण्यास, आपणांस दुय्यम असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास फर्मावील तेव्हा, तो अंमलदार अधिकारी अटक करण्यास फर्मावण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे, अटक करावयाची व्यक्ती व ज्याबद्दल अटक करावयाची आहे तो अपराध किंवा अन्य कारण विनिर्दिष्ट करणारा लेखी आदेश सुपूर्द करील आणि ज्यास याप्रमाणे फर्मावण्यात आले असेल तो अधिकारी अटक करण्यापूर्वी, जिला अटक करावयाची त्या व्यक्तीला आदेशाचा आशय विदित करील व अशा व्यक्तीने तशी मागणी केल्यास तिला तो आदेश दाखवील.
२) पोटकलम (१) मधील कोणतीही गोष्ट कलम ३५ खाली एखाद्या व्यक्तीस अटक करण्यासंबंधी पोलीस अधिकाऱ्याला असलेल्या अधिकारावर परिणाम करणार नाही.

Leave a Reply