Bnss कलम ५१७ : न्यायालय बंद होईल तो दिनांक वगळणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१७ :
न्यायालय बंद होईल तो दिनांक वगळणे :
जेव्हा न्यायालय बंद असण्याच्या दिवशी मुदतमर्यादा संपत असेल त्या बाबतीत, ज्या दिवशी न्यायालय पुन्हा सुरू होईल त्या दिवशी न्यायालयाला दखल घेता येईल.
स्पष्टीकरण :
न्यायालय कोणत्याही एखाद्या दिवशी त्याच्या नेहमीच्या कामाच्या वेळात बंद असेल तर, त्या कलमाच्या अर्थानुसार ते त्या दिवशी बंद असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply