भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४९१ :
जेव्हा बंधपत्र दंडपात्र होईल तेव्हाची कार्यपद्धती :
१) जेथे,-
(a) क) (अ) या संहितेखालील बंधपत्र न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी किंवा मालमत्ता हजर करण्यासाठी दिलेले असेल व ते दंडपात्र झाले आहे असे, त्या न्यायालयाचे किंवा ज्याच्याकडे तो खटला मागाहून वर्ग करण्यात आला अशा कोणत्याही न्यायालयाचे समाधान होईल अशा प्रकारे शाबीत केले जाईल त्या बाबतीत; अथवा
(b) ख) (ब) या संहितेखालील अन्य कोणत्याही बंधपत्राबाबत, ते दंडपात्र झाले आहे असे, ज्याने ते बंधपत्र घेतले त्या न्यायालयाचे किंवा ज्याच्याकडे तो खटला मागाहून वर्ग करण्यात आला अशा कोणत्याही न्यायालयाचे किंवा कोणत्याही प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याचे समाधान होईल अशा प्रकारे शाबीत करण्यात येईल त्या बाबतीत,
न्यायालय अशा शाबितीची आधारकारणे नमूद करील व अशा बंधपत्राने बांधलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यात नमूद केलेला दंड भरण्यास किंवा तो का भरू नये त्याचे कारण दाखवण्यास फर्मावू शकेल.
स्पष्टीकरण :
न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी किंवा मालमत्ता हजर करण्यासाठी दिलेल्या बंधपत्रातील शर्त यामध्ये, ज्याच्याकडे तो खटला मागाहून वर्ग केला जाईल करण्याची शर्त समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल.
२) जर पुरेसे कारण दाखवले नाही व दंड भरला नाही तर, न्यायालयाला या संहितेखाली असा दंड हा जणू काही त्याने लादलेला द्रवदंड असावा त्याप्रमाणे तो वसूल करण्याची कार्यवाही करता येईल :
परंतु जेव्हा असा द्रव्यदंड भरला नसेल आणि उपरोक्त पद्धतीने तो वसूल करणे शक्य नसेल तर, जामीनदार म्हणून याप्रमाणे बांधली गेलेली व्यक्ती, द्रव्यदंडाच्या वसुलीचा आदेश देणाऱ्या न्यायालयाच्या आदेशान्वये, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या दिवाणी तुरूंगातील करावासास पात्र होईल.
३) न्यायालय तसे करण्याची आपली कारणे लेखी नमूद करून निर्दिष्ट दंडाचा कोणताही भाग माफकरून फक्त अंशत: भरणा करवून घेऊ शकेल.
४) बंधपत्राचा जामीनदार ते बंधपत्र दंडपात्र होण्यापूर्वी मृत्यू पावला तर, त्याची संपदा बंधपत्राबाबतच्या समग्न दायित्वातून मुक्त होईल.
५) जिने कलम १२५ किंवा कलम १३६ किंवा ४०१ खालील जामीन दिला आहे अशा कोणत्याही व्यक्ती, जो अपराध करणे म्हणजे तिच्या बंधपत्राच्या किंवा कलम ४९४ खाली तिच्याऐवजी दुसऱ्याने निष्पादित केलेल्या बंधपत्राच्या शर्तीचा भंग ठरतो अशी अपराधाबद्दल सिद्धदोष ठरवलेले असेल तर, ज्या न्यायालयाने तिला अशा अपराधाबद्दल सिद्धदोष ठरवले त्याच्या न्यायनिर्णयाची प्रमाणित प्रत तिच्या जामीनदाराविरूद्द किंवा जामीनदारांविरूद्ध या कलमाखाली करण्यात आलेल्या कार्यवाहीत पुरावा म्हणून वापरता येईल, व जर अशी प्रमाणित प्रत याप्रमाणे वापरली गेली तर, विरूद्ध शाबीत न झाल्यास तिने असा अपराध केला असल्याचे न्यायालय गृहीत धरील.