भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६६ :
पळून गेलेल्या सिद्धदोष अपराध्याला दिलेली शिक्षा केव्हा अमलात यावयाची :
१) जेव्हा पळून गेलेल्या सिद्धदोष अपराध्याला या संहितेखाली मृत्यूची, आजीव कारावासाची किंवा द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली असेल तेव्हा, यात यापूर्वी अंतर्भूत असलेल्या उपबंधांच्या अधीनतेने, अशी शिक्षा तत्काळ अमलात येईल.
२) जेव्हा पळून गेलेल्या सिद्धदोष अपराध्याला या संहितेखाली काही मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली असेल तेव्हा,-
(a) क) (अ) अशी शिक्षा जर असा सिद्धदोष अपराधी पळून गेला तेव्हा जी शिक्षा तो भोगत होता तीहून स्वरूपत: अधिक कडक असेल तर, नवीन शिक्षा तत्काळ अमलात येइल;
(b) ख) (ब) अशी शिक्षा जर असा सिद्धदोष अपराधी पळून गेला तेव्हा जी शिक्षा तो भोगत होता तीहून स्वरूपत: अधिक कडक नसेल तर तो पळून जाण्याच्या वेळी आधीच्या त्याच्या शिक्षेपैकी राहिलेल्या भागाइतका आणखी काळ त्याने कारावास भोगल्यानंतर नवीन शिक्षा अमलात येईल.
३) पोटकलम (२) च्या प्रयोजनार्थ सश्रम कारावासाची शिक्षा साध्या कारावासाच्या शिक्षेहून अधिक कडक असल्याचे मानले जाईल.