भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३५ :
अपिले अवसान पावणे :
१) कलम ४१८ किंवा ४१९ खालील प्रत्येक अपील आरोपीचा मृत्यू होताच कायमचे अवसान पावेल.
२) (द्रव्यदंडाच्या शिक्षादेशावरील अपील खेरीजकरून) या प्रकरणाखालील अन्य प्रत्येक अपील अपीलकर्त्याचा मृत्यू होताच कायमचे अवसान पावेल :
परंतु, जेव्हा अपील दोषसिद्धीविरूद्ध व मृत्यूच्या किंवा कारावासाच्या शिक्षादेशाविरूद्ध असेल आणि अपील प्रलंबित असताना अपीलकर्ता मृत्यू पावला असेल तेव्हा, त्याच्या जवळच्या नातलगांपैकी कोणालाही अपीलकर्त्याच्या मृत्यूपासून तीस दिवसांच्या आत, अपील चालू ठेवण्यास अनुज्ञा मिळण्यासाठी अपील न्यायालयाकडे अर्ज करता येईल; वर जर अनुज्ञा दिली गेली तर, अपील अवसान पावणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमात जवळचा नातलग याचा अर्थ आई वा बाप, पती व पत्नी, रेषीय वंशज, भाऊ किंवा बहीण असा आहे.