Bnss कलम ४०८ : आणखी चौकशी करण्याची किंवा अधिक साक्षी पुरावा घेण्याचा निदेश देण्याची शक्ती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४०८ :
आणखी चौकशी करण्याची किंवा अधिक साक्षी पुरावा घेण्याचा निदेश देण्याची शक्ती :
१) अशी कार्यवाही सादर करण्यात येईल तेव्हा, सिध्ददोष व्यक्तीच्या दोेषीपणाशी किंवा निर्दोषीपणाशी संबंधित असलेल्या एखाद्या मुद्दयाबाबत आणखी चौकशी करण्यात यावी किंवा अधिक साक्षीपुरावा घेण्यात यावा असे उच्च न्यायालयाला वाटले तर, ते स्वत: अशी चौकशी करू शकेल किंवा असा साक्षी -पुरावा घेऊ शकेल, अथवा सत्र न्यायालयाकरवी ती चौकशी केली जावी किंवा साक्षी- पुरावा घेतला जावा असा निदेश देऊ शकेल.
२) जेव्हा अशी चौकशी करण्यात येईल किंवा असा साक्षी-पुरावा घेण्यात येईल तेव्हा, उच्च न्यायालयाने अन्यथा निदेशित केले नसेल तर, आरोपी व्यक्तीची उपस्थिती माफकरता येईल.
३) चौकशी उच्च न्यायालयाने केली नसेल किंवा साक्षी- पुरावा (घेतला असल्यास)उच्च न्यायालयाने घेतला नसेल तेव्हा, अशा चौकशीचा निष्कर्ष किंवा साक्षी- पुरावा प्रमाणित करून अशा न्यायालयाकडे पाठवण्यात येईल.

Leave a Reply