Bnss कलम ३९१ : विवक्षित न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्यासमोर विवक्षित अपराध केलेले असता त्यांनी त्यांची संपरीक्षा करावयाची नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३९१ :
विवक्षित न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्यासमोर विवक्षित अपराध केलेले असता त्यांनी त्यांची संपरीक्षा करावयाची नाही :
३८३, ३८४, ३८८ आणि ३८९ या कलमांमध्ये उपबंधित केले असेल तेवढे खेरीज करून एरव्ही, कलम २१५ मध्ये निर्देशिलेला कोणताही अपराध जेव्हा (उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाहून अन्य) फौजदारी न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशासमोर किंवा दंडाधिकाऱ्यासमोर किंवा त्याच्या प्राधिकाराचा अवमान केल्याने झालेला असेल अथवा न्यायालयीन कार्यवाहीच्या ओघात असा न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्याच्या दखलगिरीत आणलेला असेल तेव्हा,तो अशा अपराधाबद्दल कोणत्याही व्यक्तीची संपरीक्षा करणार नाही.

Leave a Reply