भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७६ :
मनोविकल कैदी बचाव करण्यास समर्थ असल्याचे घोषीत करण्यात आले असेल त्या बाबतीतील कार्यपद्धती :
जर कोणत्याही व्यक्तीला कलम ३६९ च्या पोटकलम (२) च्या उपबंधाखाली अडकवून ठेवलेले असेल आणि तुरूंगात अडकवलेल्या व्यक्तीच्या बाबतीत कारागृह महानिरीक्षकाने किंवा सार्वजनिक मानसिक आरोग्य आस्थापनात अडकवलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, मानसिक आरोग्य अधिनियम २०१७ (२०१७ चा १०) अंतर्गत गठित मानसिक आरोग्य समीक्षा मंडळाच्या मते अशी व्यक्ती स्वत:चा बचाव करण्यास क्षम आहे असे प्रमाणित केले तर, दंडाधिकारी किंवा न्यायालय नियत करील अशा वेळी तिला, दंडाधिकाऱ्यासमोर किंवा प्रकरणपरत्वे न्यायालयासमोर नेले जाईल, आणि दंडाधिकारी किंवा न्यायालय अशा व्यक्तीबाबत कलम ३७१ च्या उपबंधांखाली कार्यवाही करील; आणि अशा महानिरीक्षकाचे किंवा अभ्यागतांचे पूर्वोक्त प्रमाणपत्र पुराव्यात स्वीकारण्याजोगे असेल.