भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३३४ :
पुर्वीची दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती कशी शाबीत करावयाची :
या संहितेखालील कोणत्याही चौकशीत, संपरीक्षेत किंवा अन्य कार्यवाहीत, पुर्वीची दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे उपबंधित केलेल्या अन्य कोणत्याही पद्धतीव्यतिरिक्त आणखी,-
(a) क) (अ) अशी दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती ज्या न्यायालयात करण्यात आली होती त्या न्यायालयाचे अभिलेख ज्याच्या हवाली असतील त्या अधिकाऱ्याच्या सहीनिशी जो उतारा शिक्षादेशाची किंवा आदेशाची प्रत असल्याचे प्रमाणित झाले असेल त्या उताऱ्याद्वारे, किंवा
(b) ख) (ब) दोषसिध्दीच्या बाबतीत शिक्षा किंवा तिचा कोणताही भाग ज्या कारागृहात भोगला गेला असेल त्याच्या अंमलदार अधिकाऱ्याने स्वाक्षरित केलेल्या प्रमाणपत्राद्वो किंवा ज्या अन्वये शिक्षा भोगली असेल तो हवालतनामा हजर करून,
व त्याबरोबरच अशा प्रत्येक बाबतीत आरोपी व्यक्ती आणि याप्रमाणे सिध्ददोष किंवा दोषमुक्त झालेली व्यक्ती एकच असल्याबद्दलचा पुरावा सादर करून शाबीत करता येईल.