Bnss कलम ३२५ : विदेशी आयोगपत्रांची अंमलबजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३२५ :
विदेशी आयोगपत्रांची अंमलबजावणी :
१) कलम ३२१ चे उपबंध हे आणि कलम ३२२ व कलम ३२३ मधील जेवढा काही भाग आयोगपत्राची अंमलबजावणी व ते प्रतिवेदनासह परत करणे याच्याशी संबंधित असेल तेवढा भाग हे कलम ३१९ खाली काढलेल्या आयोगपत्रांना जसे लागू होतात तसे ते यापुढे उल्लेखिलेल्या न्यायालयांपैकी, न्यायाधीशांपैकी किंवा दंडाधिकाऱ्यांपैकी कोणीही काढलेल्या आयोगापत्रांबाबत लागू होतील.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेली न्यायालये, न्यायाधीश व दंडाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.
(a) क) (अ) भारतातील ज्या क्षेत्रावर या संहितेचा विस्तार नाही अशा एखाद्या क्षेत्रात अधिकारिता वापरणारे जे कोणतेही न्यायालय, न्यायाधीश किंवा दंडाधिकारी केंद्र शासन अधिसूचनेद्वारे यासंबंधात विनिर्दिष्ट करील असे न्यायालय, न्यायाधीश किंवा दंडाधिकारी;
(b) ख) (ब) भारताबाहेरील जो कोणताही देश किंवा स्थळ केंद्र शासन अधिसूचनेद्वारे यासंबंधात विनिर्दिष्ट करील तेथे अधिकारिता वापरणारे आणि फौजदारी बाबींसंबंधात साक्षीदारांची साक्षतपासणी करण्यासाठी आयोगपत्र काढण्याचा त्या देशात किंवा त्या स्थळी अमलात असलेल्या कायद्याअन्वये प्राधिकार असलेले असे कोणतेही रूग्णालय, न्यायाधीश किंवा दंडाधिकारी.

Leave a Reply