भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ४ :
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे अधिकार आणि दंडाधिकाऱ्यांना व पोलिसांना सहाय्य :
कलम ३० :
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार :
पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याहून दर्जाने वरिष्ठ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना, जेथे त्यांची नियुक्ती झाली असेल त्या स्थानिक क्षेत्रात सर्वत्र असा अधिकारी आपल्या ठाण्याच्या सीमांच्या आत वापरू शकेल ते अधिकार वापरता येतील.