Bnss कलम २९३ : प्रकरण निकालात काढणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९३ :
प्रकरण निकालात काढणे :
जर कलम २९२ अन्वये प्रकरण समाधानकारकपणे निकालात काढण्यासाठी तपशील ठरविण्यात आले असतील तर, न्यायालय पुढील पध्दतीने ते प्रकरण निकालात काढील-
(a) क) (अ) न्यायालय, कलम २९२ खालील निकालानुसार, त्या प्रकरणात हानी पोहोचलेल्या व्यक्तीला भरपाई देईल आणि शिक्षेचे परिमाण, आरोपीला चांगल्या वागणूकीसाठी परिवीक्षेवर सोडणे किंवा कलम ४०१ अन्वये समजावल्यावर परिवीक्षेवर सोडणे किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा २०) किंवा त्या त्या वेळी अमलात असलेला इतर कोणताही कायदा यांच्या तरतुदींनुसार आरोपीवर कार्यवाही करणे यासाठी पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेईल आणि आरोपीला शिक्षा देण्यासाठी अनुवर्ती खंडांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करील.
(b) ख) (ब) खंड (a) (क) (अ) अन्वये पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाचे असे मत झाले की, आरोपीच्या बाबतीत कलम ४०१ किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा २०) किंवा त्यावेळी अमलात असलेला इतर कोणताही कायदा याच्या तरतुदी लागू होतात तर ते, आरोपीला परिवीक्षेवर सोडील किंवा, अशा कोणत्याही कायद्याचा लाभ देऊ शकेल;
(c) ग) (क) खंड (b) (ख) (ब) अन्वये पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाला असे आढळून आले की, आरोपीने केलेल्या अपराधासाठी कायद्याव्दारे किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे तर, ते त्या आरोपीला अशा किमान शिक्षेच्या अर्धी शिक्षा देऊ शकेल आणि यापूर्वी कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरविले नसल्यास, आरोपीला अशा किमान शिक्षेच्या एक चतुर्थांश शिक्षा देऊ शकेल.
(d) घ) (ड) खंड (b) (ख) (ब) अन्वये पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाला जर असे आढळून आले की, आरोपीने केलेला अपराध खंड (b) (ख) किंवा खंड (c) (क) मध्ये समाविष्ट होत नाही तर, ते आरोपीला, अशा अपराधासाठी तरतूद केलेल्या किंवा त्याला लागू करण्याजोग्या असलेल्या शिक्षेच्या एक चतुर्थांश शिक्षा फर्मावू शकेल आणि जेथे आरोपी हा पहिला अपराधी आहे आणि त्याला यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आलेले नाही, अशा गुन्ह्यासाठी आरोपीला प्रदान केलेल्या किंवा वाढवता येण्याजोग्या शिक्षेच्या एक षष्ठांश (१/६) शिक्षा होऊ शकेल.

Leave a Reply