भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २१ :
दंडाधिकाऱ्याने करावयाची समन्स खटल्यांची संपरीक्षा :
कलम २७४ :
आरोपाचा आशय सांगावयाचा :
जेव्हा समन्स-खटल्यात दंडाधिकाऱ्यासमोर आरोपी उपस्थित होईल किंवा आणला जाईल तेव्हा, ज्या अपराधाचा आरोप ज्याच्यावर ठेवण्यात आला असेल, त्याचा तपशील त्याला सांगितला जाईल, आणि आपण अपराधी असल्याची कबुली त्याला द्यायची आहे की त्याला काही बचाव द्यावयाचा आहे हे विचारण्यात येईल, पण रीतसर दोषारोपाची मांडणी करण्याची जरूरी असणार नाही :
परंतु, दंडाधिकाऱ्याने आरोप निराधार मानले असल्यास, त्याने लेखी कारणे नोंदवून आरोपीला सोडावे आणि अशा सुटकेला निर्दोष परिणाम होईल.