Bnss कलम २६३ : दोषारोपांची मांडणी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २६३ :
दोषारोपांची मांडणी करणे :
१) याप्रमाणे विचार केल्यावर, तपासणी झाली असल्यास ती तपासणी झाली असल्यास ती तपासणी आणि सुनावणी झाल्यानंतर जर, या प्रकरणाखाली संपरीक्षा करण्याजोगा अपराध आरोपीने केला आहे हे गृहीत धरण्यास आधार आहे असे दंडादिकाऱ्याचे मत झाले आणि असा दंडाधिकारी त्या अपराधाची संपरीक्षा करण्यास सक्षम असून, त्याच्या मते तो त्याबद्दल पर्याप्त शिक्षा देऊ शकत असेल तर, तो आरोपीविरूध्द अरोपाच्या पहिल्या सुनावणीच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत, दोषारोपाची लेखी मांडणी करील.
२) नंतर आरोपीला दोषारोप वाचून दाखवण्यात येईल व समजावून सांगण्यात येईल, आणि दोषारोप केलेला अपराध तो कबूल करणार आहे की आपली संपरीक्षा केली जाण्याची मागणी करणार आहे हे त्याला विचारले जाईल.

Leave a Reply