भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५ :
एका संपरीक्षेत अधिक अपराधांबद्दल दोषसिध्दी झाल्यास त्या प्रकरणी द्यावयाची शिक्षा :
१) जेव्हा एखादी व्यक्ती एका संपरीक्षेत दोन किंवा अधिक अपराधांबद्दल सिध्ददोष झालेली असेल तेव्हा अशा अपराधांकरता विहित केलेल्या ज्या शिक्षा देण्यास न्यायालय सक्षम असेल अशा अनेक शिक्षा असे न्यायालय भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ९ च्या उपबंधांच्या अधीनतेने, त्या व्यक्तीला त्याबद्दल देऊ शकेल आणि न्यायालय अपराधांची गंभीरता लक्षात घेऊन, अशा शिक्षा एकाचवेळी किंवा सलगपणे चालवण्याचा आदेश देईल.
२) क्रमवती शिक्षांच्या बाबतीत, न्यायालयाने अनेक अपराधांबद्दल दिलेली एकूण शिक्षा ही एका अपराधाबद्दल दोषसिध्दी झाल्यावर ते न्यायालय जितकी शिक्षा देण्यास सक्षम असेल तिच्यापेक्षा अधिक आहे एवढयाच केवळ कारणाने अपराध्याला संपरीक्षेसाठी वरिष्ठ न्यायालयाकडे पाठविण्याची जरूरी असणार नाही.
परंतु,
(a) क) (अ) काही झाले तरी, अशा व्यक्तीला वीस वर्षांहून दीर्घतर मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली जाणार नाही.
(b) ख) (ब) एकूण शिक्षा ही, ते न्यायालय एका अपराधाबद्दल जितकी शिक्षा देण्यास सक्षम असेल तिच्या दुपटीहून अधिक असणार नाही.
३) सिध्ददोष व्यक्तीने करावयाच्या अपिलाच्या प्रयोजनार्थ, या कलमखाली तिला देण्यात आलेल्या एकूण क्रमवर्ती शिक्षा म्हणजे एकच शिक्षा असल्याचे मानले जाईल.