भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २५४ :
फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा :
१) याप्रमाणे निश्चित केलेल्या तारखेस न्यायाधीश फिर्यादीपक्षाच्या पुष्टयर्थ हजर केला जाईल असा सर्व साक्षीपुरावा घेण्याचे काम सुरू करील :
परंतु, या कलमाखाली साक्षीदाराचा पुरावा दृकश्राव्य (ऑडियो व्हिडियो) इलैक्ट्रॉनिक माध्यमातून नोंदवला जाऊ शकतो.
२) कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा लोकसेवकाच्या पुराव्याची साक्ष्य दृकश्राव्य (ऑडियो – व्हिडियो) इलेक्ट्रॉनिक माध्यामातू घेतली जाऊ शकते.
३) न्यायाधीश स्वविवेकानुसार, एखाद्या साक्षीदाराची उलटतपासणी अन्य कोणत्याही साक्षीदाराची किंवा साक्षीदारांची साक्षतपासणी होईपर्यंत लांबणीवर टाकण्यास परवानगी देऊ शकेल किंवा कोणत्याही साक्षीदारास आणखी उलटतपासणीसाठी पुन्हा बोलावू शकेल.