Bnss कलम २४२ : एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४२ :
एका वर्षातील एकाच प्रकारच्या अपराधांबद्दल एकत्रितपणे दोषारोप ठेवता येणे :
१) जेव्हा एकाच प्रकारचे एकाहून जास्त अपराध, अशांपैकी पहिल्या अपराधापासून शेवटच्या अपराधापर्यंतच्या बारा महिन्यांच्या अवधीत केल्याबद्दल- मग ते त्याच व्यक्तीबाबत असोत वा नसोत एखाद्या व्यक्तीवर आरोप करण्यात आला असेल तेव्हा, त्यांपैकी जास्तीत जास्त पाच इतक्या मर्यादेपर्यंत कितीही अपराधांचा दोषारोप तिच्यावर ठेवून एकाच संपरीक्षेत तिची संपरीक्षा करता येईल.
२) जेव्हा अपराध हे भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या अथवा कोणत्याही विशेष किंवा स्थानिक कायद्याच्या त्याच कलमाखाली तेवढयाच शिक्षेस पात्र असतात तेव्हा, ते एकाच प्रकारचे असतात.
परंतु, या कलमाच्या प्रयोजनार्थ भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३०३ च्या पोटकलम (२) खाली शिक्षापात्र असलेला अपराध हा उक्त संहितेच्या कलम ३०५ खालील शिक्षापात्र अपराध ज्या प्रकारचा आहे त्याच प्रकारचा असल्याचे मानण्यात येईल, आणि उक्त संहितेच्या अथवा कोणत्याही विशेष किंवा स्थानिक कायद्याच्या कोणत्याही कलमाखालील शिक्षापात्र अपराध करण्याचा प्रयत्न करणे हा अपराध असेल तेव्हा, त्या कलमाखालील शिक्षापात्र अपराध हा अशा प्रयत्नाच्याच प्रकारचा अपराध असल्याचे मानण्यात येईल.

Leave a Reply