भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २३१ :
सत्र न्यायालयाने सेशनमध्ये चालणाऱ्या खटल्यास आरोपीला नकला पुरविणे :
पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्य प्रकारे गुदरलेल्या खटल्यात, तो अपराध केवल सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा आहे, असे कलम २२७ खाली आदेशिका काढणाऱ्या दंडाधिकाऱ्याला दिसून येईल त्या बाबतीत, तो दंडाधिकारी आरोपीला ताबडतोब पुढीलपैकी प्रत्येकाची एकेक प्रतं विनामुल्य पुरवील :
एक) दंडाधिकाऱ्याने साक्षतपासणी केलेल्या सर्व व्यक्तींचे कलम २२३ किंवा २२५ खाली नोंदवलेले जबाब;
दोन) कलम १८० वा कलम १८३ खाली कोणतेही कबुलीजबाब व जबाब नोंदवलेले असल्यास, ते;
तीन) दंडाधिकाऱ्यापुढे हजर केलेल्या ज्या कोणत्याही दस्तऐवजांचा आधार घेण्याचे फिर्यादीपक्षाने ठरवले असेल ते दस्तऐवज :
परंतु, असा कोणताही दस्तऐवज अतिविस्तूत आहे अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर, आरोपीला त्याची प्रत पुरवण्याऐवजी, तो आरोपीला जातीने किंवा न्यायालयात वकिलामार्फ त त्याचे निरीक्षण करण्याची परवानगी देण्यात यावी असे निदेशित करील :
परंतु आणखी असे की, इलेक्ट्रॉनिक स्वरुपात दस्तऐवजांचा पुरवठा योग्यरित्या सुसज्ज मानला जाईल.