Bnss कलम १९१ : फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १९१ :
फिर्यादी साक्षीदारांवर निर्बंध लादता कामा नये :
कोणताही फिर्याददार किंवा साक्षीदार कोणत्याही न्यायालयाकडे जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पोलीस अधिकाऱ्याबरोबर जाण्यास भाग पाडता कामा नये अथवा अनावश्यक निर्बंध किंवा गैरसोय सोसावयास लावता कामा नये अथवा त्याच्या उपस्थितीसाठी त्याच्या जातमुलक्या व्यतिरिक्त अन्य कोणताही जामीन देण्यास त्याला भाग पाडता कामा नये.
परंतु, जर कोणत्याही फिर्याददाराने किंवा साक्षीदाराने समक्ष हजर राहण्यास किंवा कलम १९० खाली निदेशित केल्याप्रमाणे बंधपत्र निष्पादित करण्यास नकार दिला तर, पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी त्याला बंदोबस्तानिशी दंडाधिकाऱ्याकडे पाठवू शकेल व तो असे बंधपत्र निष्पादित करीपर्यंत किंवा प्रकरणाची सुनावणी पुरी होईपर्यंत दंडाधिकारी त्याला हवलतीत स्थानबद्ध करू शकेल.

Leave a Reply