Bnss कलम १६५ : तंट्याची मिळकत जप्त करणे आणि देखभाल अधिकारी नेमणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६५ :
तंट्याची मिळकत जप्त करणे आणि देखभाल अधिकारी नेमणे :
१) जर कलम १६४ च्या पोटकलम (१) खाली आदेश दिल्यानंतर कोणत्याही वेळी दंडाधिकाऱ्याला ते प्रकरण आणीबाणीचे वाटले किंवा कलम १६४ मध्ये निर्दिष्ट केला आहे तसा कब्जा त्या वेळी कोणत्याही पक्षाकडे नव्हता तसा त्याने निर्णय केला किंवा त्यांच्यापैकी कोणाकडे तंटयाच्या विषयवस्तूचा कब्जा होता याबाबत स्वत:ची खात्री होऊ शकत नसेल तर, तंटयाच्या विषयवस्तूंच्या कब्जाला कोणती व्यक्ती हक्कदार आहे याविषयी त्या पक्षांचे हक्क सक्षम न्यायालय निर्णीत करीपर्यंत त्या दंडाधिकाऱ्याला ती जप्त करता येईल-
परंतु, तंटयाच्या विषयवस्तूच्या संबंधात शांततेचा भंग होण्याचा यापुढे कसलाही संभव नाही याबाबत अशा दंडाधिकाऱ्याची खात्री झाल्यास त्याला कोणत्याही वेळी जप्ती मागे घेता येईल.
२) जेव्हा दंडाधिकारी तंटयाची विषयवस्तू जप्त करील तेव्हा, अशा तंटयाच्या विषयवस्तूच्या संबंधात कोणत्याही दिवाणी न्यायालयाने प्रापक नियुक्त केला नसेल तर, मालमत्तेची देखभाल करण्यासाठी आपल्याला योग्य वाटेल अशी व्यवस्था त्या दंडाधिकाऱ्याला करता येईल किंवा त्याला योग्य वाटल्यास तिच्याबाबत प्रापक नियुक्त करता येईल, व त्या प्रापकाला, दंडाधिकऱ्याच्या नियंत्रणाच्या अधीनतेने, दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५ ) याखाली नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रापकाचे सर्व अधिकार असतील –
परंतु, तंटयाच्या विषयवस्तूच्या संबंधात मागाहून दिवाणी न्यायालयाने प्रापकाची नियुक्ती केल्यास दंडाधिकारी,-
(a) क) (अ) त्याने स्वत: नियुक्त केलेल्या प्रापकाने, दिवाणी न्यायालयाकडून नियुक्त झालेल्या प्रापकाकडे तंटयाच्या विषयवस्तूचा कब्जा द्यावा असा आदेश देईल, आणि स्वत:नियुक्त केलेल्या प्रापकाला त्यानंतर कार्यमुक्त करील;
(b) ख) (ब) न्याय्य असतील असे अन्य आनुषंगिक किंवा परिणामरूप आदेश काढू शकेल.

Leave a Reply