भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १२९ :
सराईत अपराध्यांकडून चांगल्या वर्तणुकीसाठी जामीन :
जी व्यक्ती-
(a) क)(अ) सरावलेला असा जबरी चोर, घरफोडया, चोर किंवा बनावटकार आहे, किंवा
(b) ख) (ब) मालमत्ता चोरीची आहे हे माहीत असताना चोरीची मालमत्ता घेण्यास सरावलेली आहे, किंवा
(c) ग) (क)चोरांना संरक्षण किंवा आसरा देण्यास, अथवा चोरीची मालमत्ता लपविण्याच्या किंवा तिची विल्हेवाट करण्याच्या कामी मदत करण्यास सरावलेली आहे, किंवा
(d) घ) (ड) अपनयन, अपहरण,बलाद्ग्रहण, ठकवणूक किंवा आगळीक अथवा भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या १० व्या प्रकरणाखाली, किंवा त्या संहितेच्या कलम १७८, कलम १७९, कलम १८० किंवा १८१ खाली शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध करण्यास सरावलेली आहे, किंवा करण्याचा प्रयत्न करते, किंवा करण्यास अपप्रेरणा देते, किंवा
(e) ङ) (इ) शांतताभंग ज्यात अनुस्यूत आहे असे अपराध करण्यास सरावलेली आहे, किंवा करण्याचा प्रयत्न करते, किंवा करण्यास अपप्रेरणा देते, किंवा
(f) च) (फ) (एक) पुढील अधिनियमांपैकी म्हणजे,-
(a) क)(अ) औषधी द्रव्य व प्रसाधन अधिनियम, १९४० (१९४० चा २३);
(b) ख) (ब) विदेशी व्यक्तीबाबत अधिनियम, १९४६ (१९४६ चा ३१);
(c) ग) (क) कर्मचारी भविष्य निधी आणि कुटुम्ब पेंशन निधि अधिनियम, १९५२ (१९५२ चा १९);
(d) घ) (ड) अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ (१९५५ चा १०);
(e) ङ) (इ) नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ (१९५५ चा २२);
(f) च) (फ) सीमाशुल्क अधिनयम, १९६२(१९६२ चा ५२);
(g) छ) (ग) अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम २००६ (२००६ चा ३४),
यांपैकी एका किंवा अधिक अधिनियमांखालील कोणताही अपराध; किंवा
दोन) साठेबाजीस अथवा भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्याचा उपबंध करणाऱ्या अन्य कोणत्याही कायद्याखाली शिक्षापत्र असलेला कोणताही अपराध करण्यास सरावलेली आहे, किंवा करण्याचा प्रयत्न करते, किंवा करण्यास अपप्रेरणा देते, किंवा
(g) छ) (ग) इतकी दु:साहसी आणि धोकादायक आहे की, ती जामिनाशिवाय मोकळी राहणे हे समाजास धोक्याचे आहे,
अशी एखादी व्यक्ती आपल्या स्थानिक अधिकारितेत आहे अशी जेव्हा कार्यकारी दंडधिकाऱ्यास खबर मिळेल तेव्हा, यात यापुढे उपबंधित केलेल्या रीतीने असा दंडाधिकारी, त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीपुरते अशा व्यक्तीला चांगली वागणूक ठेवण्यासाठी जामीनपत्र निष्पादित करण्याचा आदेश तिला का देऊ नये याचे कारण दाखविण्यास त्या व्यक्तीला फर्मावू शकेल.