भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १०४ :
अधिकारक्षेत्राबाहेरील झडती मध्ये मिळालेल्या वस्तूंची विल्हेवाट :
ज्या न्यायालयाने झडती-वॉरंट काढले त्याच्या स्थानिक अधिकारितेच्या पलीकडील कोणत्याही स्थळी त्याची अंमलबजावणी करताना, ज्यांच्यासाठी झडती घेतली त्यांपैकी कोणत्याही वस्तू सापडल्या असतील तेव्हा, अशा वस्तू यात यापुढे अंतर्भूत असलेल्या उपबंधाखाली त्यांची यादी तयार करून तीसह, वॉरंट काढणाऱ्या न्यायालयासमोर तत्काळ नेल्या जातील – मात्र, अशा स्थळापासून तेथे अधिकारिता असलेला दंडाधिकारी उपरोक्त न्यायालयाहून अधिक जवळ असेल तर, त्या बाबतीत ती यादी व त्या वस्तू तत्काळ अशा दंडाधिकाऱ्यासमोर नेण्यात येतील; आणि सबळ विरोधी कारण नसेल तर असा दंडाधिकारी अशा न्यायालयासमोर त्या नेण्यास प्राधिकृत करणारा आदेश काढील.