Bns 2023 कलम ६१ : फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) :

भारतीय न्याय संहिता २०२३
फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) या विषयी :
कलम ६१ :
फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) :
कलम : ६१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : (२) (क) (अ) मृत्यूच्या किंवा आजन्म कारावासाच्या किंवा दोन वर्षे अगर त्याहून अधिक मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा फौजदारीपा कट
शिक्षा : कटाला उद्दिष्टभूत असलेल्या अपराधाच्या अपप्रेरणेसाठी असेल त्यानुसार
दखलपात्र / अदखलपात्र : कटाला उद्दिष्टभूत असलेला अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : कटाला उद्दिष्टभूत असलेला अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कटाला उद्दिष्टभूत असलेल्या अपराधाच्या अपप्रेरणाचे कृत्य ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
अपराध : (२) (ख) (ब) अन्य कोणताही फौजदारी पात्र कट
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी
———
१) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून –
(a) क) (अ) एखादी अवैध कृती – किंवा
(b) ख) (ब) एखादी अवैध नसलेली कृती अवैध साधनांमार्फत , करण्याचा किंवा करविण्याचा करार करतात तेव्हा त्या करारास फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) असे म्हटले जाते :
परंतु, अपराध करण्याचा करार वगळता जर इतर करार असेल तेव्हा त्या कराराच्या सभासदापैकी एकाने अगर अधिकांनी त्यानुसार अशा कराराव्यतिरिक्त आणखी एखादी कृती केल्याशिवाय फौजदारीपात्र कट (आपराधिक षडयंत्र) या सदरात मोडणार नाही.
स्पष्टीकरण :
ती अवैध कृती हे अशा कराराचे अंतिम उद्दिष्ट आहे की, त्या उद्दिष्टास ती नुसती आनुषंगिक आहे हे बिनमहत्वाचे आहे.
२) जो कोणी,
(a) क) (अ) मृत्यूच्या, आजीवन कारावासाच्या अथवा दोन वर्षे किंवा अधिक मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असा अपराध करण्याच्या फौजदारीपात्र कटातील पक्ष – सभासद असेल त्याला, अशा कटाबद्दलच्या या संहितेत शिक्षेची स्पष्ट तरतुद नसेल तेव्हा, त्याने जणू काही अशा अपराधास अपप्रेरणा (चिथावणी) दिलेली असावी त्याप्रमाणे शिक्षा होईल.
(b) ख) (ब) जो कोणी वरील प्रकारचा शिक्षापात्र असलेला अपराध वगळता इतर अपराध करण्याच्या फौजदारीपात्र (आपराधिक षडयंत्र) कटातील पक्ष- सभासद असेल त्याला जास्तीत जास्त सहा महिने इतक्या मुदतीच्या दोन्हीं पैकी कोणत्या तरी एका वर्णनाची कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

This Post Has 2 Comments

Leave a Reply