भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५० :
अपप्रेरित (चिथावणी ज्याला दिली आहे) व्यक्तीने अपप्रेरकाच्यापेक्षा (चिथावणी देणाऱ्यापेक्षा) वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास अपप्रेरणाबद्दल (चिथावणी देण्याबद्दल) शिक्षा :
कलम : ५०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही अपराधांचे अपप्रेरण, जर अपप्रेरित व्यक्तीने अपप्रेरकाच्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने कृती केल्यास.
शिक्षा : अपप्रेरित अपराधाला असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अपप्रेरित अपराध शमनीय किंवा अशमनीय असेल त्यानुसार.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जर कोणी अपराध करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) दिली असेल आणि अपप्रेरित (चिथावणी दिल्या गेलेल्या) व्यक्तीने अपप्रेरकाच्यापेक्षा (चिथावणी देणाऱ्यापेक्षा) वेगळ्या उद्देशाने किंवा जाणिवेने ती कृती केली असेल, तर अपप्रेरकाला (चिथावणी देणाऱ्याला) अपप्रेरकासारख्याच (चिथावणी देणाऱ्यासारख्याच) उद्देशाने किंवा जाणिवेने – अन्य कोणत्याही नव्हे – ती कृती केली गेली असती तर जो अपराध घडला असता त्याकरता उपबंधित (तरतूद) केलेली शिक्षा मिळेल.
Pingback: Ipc कलम ११० : अपप्रेरित (चिथावणी ज्याला दिली आहे) व्यक्तीने