भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४७ :
भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये अपप्रेरण (चिथावणी देणे) :
जी कोणतीही कृती भारतात केली गेली तर अपराध ठरेल ती कृती भारताबाहेर आणि त्याच्या पलीकडे करण्यास जी व्यक्ती भारतामध्ये असताना अपप्रेरणा (चिथावणी) देते ती व्यक्ती या संहितेच्या अर्थानुसार अपराध करते.
उदाहरण :
भारतात असताना (क) हा एक्स देशातील (ख) या विदेशी व्यक्तीला त्या देशात खून करण्यास चिथावणी देतो. (क) हा खुनाला अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी आहे.
Pingback: Ipc कलम १०८-अ : भारताबाहेरील अपराधांचे भारतामध्ये अपप्रेरण