Bns 2023 कलम ४१ : मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४१ :
मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणण्याइतपत केव्हा व्यापक असतो :
जो अपराध करण्यात आल्यामुळे किंवा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे मालमत्तेचा खाजगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग उद्भवतो तो अपराध यात यापुढे नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही वर्णनाचा असेल तर, कलम ३७ मध्ये उल्लेखिलेल्या निर्बंधांच्या अधीनतेन, तो हक्क इच्छापूर्वक अपकृत्य करणाऱ्याचा मृत्यू घडवून आणण्याइतपत किंवा त्याला अन्य कोणतीही अपाय करण्याइतपत व्यापक असतो. ती वर्णने अशी :
(a) क) (अ) जबरी चोरी.
(b) ख) (ब) रात्रीची घरफोडी.
(c) ग) (क) यात जी इमारत, तंबू किंवा जलयान माणसांचे वसतिस्थान म्हणून अगर मालमत्ता ठेवण्यांचे स्थान म्हणून वापरले जाते अशा कोणत्याही इमारतीला, तंबूला किंवा जलयानाला आग लावून किंवा स्फोटक पदार्था द्वारा आगळीक करणे;
(d) घ) ड) खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क जर वापरला नाही, तर मृत्यू किंवा जबर दुखापत होईल अशी ज्यामुळे वाजवी धास्ती निर्माण होईल, अशा परिस्थितीत चोरी, आगळीक (अपक्रिया) किंवा गृह- अतिक्रमण.

This Post Has One Comment

Leave a Reply