भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३५८ :
निरसन व व्यावृत्ति :
१) भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याद्वारे निरसित करण्यात आली आहे.
२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेला अधिनियम निरसित केला असला तरी निम्नलिखित वर याचा परिणाम होणार नाही,-
(a) क) असे निरसित अधिनियमाच्या पूर्व संप्रवर्तन किंवा त्या अन्वये रितसर केलेली किंवा भोगलेली कोणतीही गोष्ट; किंवा
(b) ख) अशा निरसित अधिनियमाच्या अधीन प्राप्त झालेले कोणतेही अधिकार, विशेषाधिकार, दायित्व किंवा उत्तरदावित्व ; किंवा
(c) ग) अशा निरसित केलेल्या अधिनियमा विरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधासंबंधी केलेली शिक्षा, समपहरण किंवा दंड; किंवा
(d) घ) या प्रकारच्या कोणत्याही शिक्षा, समपहरण किंवा दंड या संबंधी कोणतीही चौकशी किंवा उपाय ; किंवा
(e) ङ) उपरोक्त शिक्षा किंवा दंड या संबंधी कोणतीही कार्यवाही, चौकशी किंवा उपाय आणि अशा प्रकारे कार्यवाही किंवा उपाय स्थापित केले जाऊ शकतात, जारी राहू शकतील किंवा प्रवृत्त राहू शकतील आणि अशा प्रकारे कोणताही शास्ति अधिरोपित केली जाऊ शकेल, की जेसे ती संहिती निरसित केली नव्हती.
३) असे निरसित असून ही, उक्त संहितेच्या अधीन केलेली कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही कार्यवाही, त्याठिकाणी या सहितेच्या तरतुदींच्या अधीन केली गेली असेल मानले जाईल.
४) पोटकलम (१) मध्ये निरसनाच्या प्रभावाविषयी नमूद केलेल्या विशिष्ट बाबी, सामान्य खंड अधिनियम १८९७ (१८९७ चा १०) याच्या कलम ६ च्या सामान्य अनुप्रयोगास पूर्वग्रह देणारी किंवा प्रभावित करणारी मानली जाणार नाही.