भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३४९ :
नकली स्वामित्व चिन्हाने अंकित असलेला माल विकणे:
कलम : ३४९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नकली स्वामित्व-चिन्हाने अंकित असलेला माल जाणीवपूर्वक विकणे.
शिक्षा : १ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : जिच्या व्यापार-चिन्हाचे किंवा स्वामित्व-चिन्हाचे नकलीकरण झाले ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही मालावर, किंवा वस्तूवर, अथवा ज्याच्या आत असा माल आहे असा कोणताही खोका, आवेष्टन किंवा अन्य पात्र यावर एखादे नकली स्वामित्व चिन्ह लावलेले, किंवा ठसवलेले असताना जो कोणी असा माल किंवा वस्तू विकेल, अथवा विक्रिसाठी मांडील किंवा कब्जात बाळगील त्याने –
(a) क) (अ) या कलमाच्या विरुद्ध कोणताही अपराध घडू नये म्हणून सर्व प्रकारे वाजवी खबरदारी घेतलेली असल्यामुळे, अभिकथित अपराध घडतेवेळी चिन्हाच्या खरेपणाविषयी संशय घेण्याचे आपणास कारण नव्हते, आणि
(b) ख) (ब) आपण ज्या व्यक्तीकडून असा माल किंवा वस्तू मिळवल्या त्यांच्या बद्दल फिर्यादीने किंवा त्याच्या वतीने केलेल्या मागणीनुसार यथाशक्ती सर्व माहिती दिली, किंवा
(c) ग) (क) अन्यथा आपण निरागसपणे वागलो होतो,
असे शाबीत केले नाही तर, त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.