Bns 2023 कलम ३२१ : धनकोंना ॠण उपलब्ध होऊ देण्यास अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने प्रतिबंध करणे:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३२१ :
धनकोंना ॠण उपलब्ध होऊ देण्यास अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने प्रतिबंध करणे:
कलम : ३२१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपराध्याला येणे असलेले ऋृण किंवा रक्कम त्याच्या धनकोंना उपलब्ध होऊ देण्यास कपटपणाने प्रतिबंध करणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : त्यामुळे बाधित झालेले धनको.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला येणे असलेले कोणतेही ॠण किंवा मागणी रक्कम आपल्या ॠणांच्या किंवा अशा अन्य व्यक्तीच्या ॠणांच्याफेडीसाठी कायद्यानुसार उपलब्ध होऊ देण्यास अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने प्रतिबंध करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply