भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २९२ :
ज्यांबाबत अन्यथा उपबंध (तरतुद) केलेला नाही त्या प्रकरणी सार्वजनिक उपद्रवासाठी शिक्षा :
कलम : २९२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अन्यथा अनुपबन्धित प्रकरणांमध्ये सार्वजनिक उपद्रवासाठी शिक्षा.
शिक्षा : १००० रुपये द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी या संहितेप्रमाणे अन्यथा शिक्षापात्र नसलेल्या प्रकरणी सार्वजनिक उपद्रव करील, त्याला एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.