Bns 2023 कलम २८९ : यंत्रसामग्रीबाबत हयगयीचे वर्तन :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८९ :
यंत्रसामग्रीबाबत हयगयीचे वर्तन :
कलम : २८९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही यंत्रसामग्रीबाबत याप्रमाणे हयगयीचे वर्तन करणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येईल किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा क्षती (नुकसान) होण्याचा संभव असेल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने जो कोणी कोणतीही कृती करील, अथवा आपल्या कब्जातील किंवा देखरेखीखालील कोणत्याही यंत्रसामग्रीमुळे मानवी जीविताला पोचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त अशा यंत्रसामग्रीबाबत करण्याचे जाणीवपूर्वक अगर हयगयीने टाळील, तर त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply