Bns 2023 कलम २६७ : न्यायिक कार्यवाहीत पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २६७ :
न्यायिक कार्यवाहीत पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणणे :
कलम : २६७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : न्यायिक कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा साधा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : अपराध ज्या न्यायालयात घडला असेल ते न्यायालय प्रकरण २८ च्या उपबंधांच्या अधीनतेने; किंवा कोणत्याही न्यायालयात नसल्यास, कोणताही दंडाधिकारी.
———
एखादा लोकसेवक न्यायिक कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात पीठासीन असताना जो कोणी उद्देशपूर्वक अशा लोकसेवकाचा कोणत्याही प्रकारे अपमान करील, किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणील त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

This Post Has One Comment

Leave a Reply