Bns 2023 कलम २४० : घडलेल्या अपराधाबाबत खोटी माहिती देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २४० :
घडलेल्या अपराधाबाबत खोटी माहिती देणे :
कलम : २४०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : घडलेल्या अपराधाबाबद खोटी माहिती देणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
अपराध घडलेला आहे हे माहीत असून, किंवा तसे समजण्यास कारण असून, जो कोणी त्या अपराधाविषयी जी माहिती खोटी असल्याचे त्याला माहीत आहे किंवा तसे तो समजतो अशी कोणतीही माहिती देईल त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
कलम २३८, २३९७ आणि हे कलम यामधील अपराध या शब्दामध्ये भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी करण्यात आलेली जी कोणतीही कृती भारतात केली, तर पुढीलपैकी कोणत्याही कलमाखाली शिक्षेस पात्र ठरू शकेल, त्या कृतीचा समावेश आहे. ती कलमे अशी- कलम १०३, १०५, १७२, ३०७, कलम ३०९ चे पोटकलम (२), पोटकलम (३) आणि पोटकलम (४), कलम ३१० चे पोटकलम (२), पोटकलम (३), पोटकलम (४) आणि पोटकलम (५), कलम ३११, ३१२, कलम ३२६ चे खंड (च) (f)आणि खंड (छ) (g), कलम ३३१ चे पोटकलम (४), पोटकलम (४), पोटकलम (६), पोटकलम (७) आणि पोटकलम (८), कलम ३३२ चा खंड (क) (a)आणि खंड (ख) (b).

This Post Has One Comment

Leave a Reply