भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २१४ :
प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना लोकसेवकाला उत्तर देण्यास नकार देणे :
कलम : २१४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सत्यकथन करण्यास विधित: बद्ध असताना प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे.
शिक्षा : ६ महिन्याचा साधा कारावास किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :अपराध ज्या न्यायालयात घडला असेल ते न्यायालय प्रकरण २८ च्या उपबंधांच्या अधीनतेने; किंवा जर न्यायालयात घडला नसेल तर, कोणताही दंडाधिकारी.
———
कोणत्याही लोकसेवकाला कोणत्याही विषयासंबंधी सत्यकथन करण्यास कायद्याने स्वत: विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असून जो कोणी त्याला अशा लोकसेवकाने आपल्या वैध अधिकारांचा वापर करून त्या विषयासंबंधी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास नकार देईल त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १७९ : प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना लोकसेवकाला