भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २१३ :
शपथ घेण्यास किंवा दृढकथन करण्यास लोकसेवकाने रीतसर फर्माविले असता त्यास नकार देणे :
कलम : २१३
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शपथ घेण्यास लोकसेवकाने रीतसर फर्मावले असता त्यास नकार देणे.
शिक्षा : ६ महिन्याचा साधा कारावास किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : अपराध ज्या न्यायालयात घडला असेल ते न्यायालय प्रकरण २८ च्या उपबंधांच्या अधीनतेने; किंवा जर न्यायालयात घडला नसेल तर, कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी, त्याने सत्य कथन करण्यासाठी स्वत:ला शपथेने किंवा दृढकथनाने बांधून घ्यावे असे फर्माविण्यास विधित: (कायद्याने) सक्षम असलेल्या लोकसेवकाने याप्रमाणे बांधून घेण्यास फर्माविले असता त्याप्रमाणे स्वत:ला बांधून घेण्यास नकार देईल त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १७८ : शपथ घेण्यास किंवा दृढकथन करण्यास लोकसेवकाने