भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १८० :
बनावट किंवा नकली नाणे, शासकीय मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट कब्जात बाळगणे :
कलम : १८०
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा कब्जात बाळगणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
जो कोणी, नकली असल्याचे स्वत:ला माहित आहे किंवा तसे समजण्यास कारण आहे, कोणतेही बनावट किंवा नकली नाणे, कोणताही मुद्रांक, चलनी नोट किंवा बँक नोट, असली म्हणून वापरले जाऊ शकेल म्हणून कब्जात बाळगिल त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्हीं पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
स्पष्टीकरण :
जर एखाद्या व्यक्तीने बनावट किंवा बनावट नाणे, मुद्रांक, चलन-नोट किंवा बँक-नोटा कायदेशीर स्त्रोताकडून असल्याचे स्थापित केले तर तो या कलमाखाली गुन्हा ठरणार नाही.
Pingback: Ipc कलम २५० : बदल करण्यात आला आहे हे माहीत असताना कब्जात
Pingback: Ipc कलम २५१ : बदल करण्यात आला आहे हे माहीत असताना कब्जात
Pingback: Ipc कलम २५९ : नकली शासकीय मुद्रांक कब्जात बाळगणे :