भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १६५ :
व्यापारी जलयानावर नौकाधिपतीच्या हयगयीमुळे पलायित (पळालेला) इसम (व्यक्ती) लपून राहणे :
कलम : १६५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : व्यापारी जलयानाववर त्याच्या नौकाधिपतीच्या अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला आसरा देणे.
शिक्षा : ३००० रुपये द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
भारत सरकारच्या भूसेनेतील, नौसेनेतील किंवा वायुसेनेतील कोणताही पलायित (पळालेला) इसम (व्यक्ती) ज्या व्यापारी जलयानावर लपलेला असेल, त्याचा नौकाधिपती किंवा ताबा असलेली हुकूमतदार व्यक्ती हे अशा लपून राहण्याबद्दल जरी अज्ञानी असले, तरी असा नौकाधिपती किंवा हुकूमतदार म्हणून असलेल्या आपल्या कर्तव्यात काही हलगर्जीपणा झाला नसता किंवा त्या जलयानावर अनुशासनाची काही उणीव राहून गेली नसती, तर त्यांना अशा लपून राहण्याचे वृत्त कळले असते असे असल्यास, तो किंवा ती जास्तीत जास्त तीन हजार रुपये दंडास पात्र होईल.
Pingback: Ipc कलम १३७ : व्यापारी जलयानावर नौकाधिपतीच्या हयगयीमुळे