Bns 2023 कलम १५९ : लष्करी बंडास अपप्रेरणा (चिथावणी) देणे, अथवा भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक यांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ८ :
भूसेना, नौसेना आणि वायूसेना यासंबंधीच्या अपराधाविषयी :
कलम १५९ :
लष्करी बंडास अपप्रेरणा (चिथावणी) देणे, अथवा भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक यांना त्यांच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करणे :
कलम : १५९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लष्करी बंडास अपप्रेरणा देणे, अथवा अधिकारी, भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक याला त्याच्या निष्ठेपासून किंवा कर्तव्यापासून विचलित करण्याचचा प्रयत्न करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी भारत सरकारच्या भूसेनेतील, नौसेनेतील किंवा वायुसेनेतील अधिकाऱ्याला -भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला बंड करण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल अथवा अशा कोणत्याही अधिकाऱ्याला, भूसैनिकाला, नौसैनिकाला किंवा वायुसैनिकाला त्यांच्या निष्ठेपासून किंवा त्याच्या कर्तव्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करील त्याला, आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

This Post Has One Comment

Leave a Reply