Bns 2023 कलम १५२ : भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १५२ :
भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये :
कलम : १५२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये.
शिक्षा : आजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा ७ वर्षांचा करावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय
———
जो कोणी, हेतुपुरस्सर किंवा जाणूनबुजून, एकतर तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे किंवा खुणांद्वारे, किंवा दृश्य प्रतिरुपणाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे (संसुचनाद्वारे) किंवा वित्तीय साधनांच्या वापरा द्वारा, किंवा अन्यथा अलिप्तता किंवा सशस्त्र बंडखोरी किंवा विध्वंसक क्रियाकलापांना उत्तेजन देणे किंवा प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणे किंवा फुटीरतावादी क्रियाकलापांच्या भावनेला प्रोत्साहन देणे किंवा भारताचे सार्वभौमत्व किंवा एकता आणि अखंडता धोक्यात आणतो किंवा अशा गुन्ह्यात सामील होतो, त्याला आजन्म कारावासाची किंवा सात वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या कलमामध्ये निर्दिष्ट केलेल्या क्रियाकलापांना उत्तेजन दिल्याशिवाय किंवा प्रवृत्त करण्याच्या प्रयत्न न करता कायदेशीर मार्गाने बदलण्याच्या उद्देशाने शासनाच्या उपाययोजना किंवा प्रशासकीय किंवा इतर कृतींबद्दल नापसंती व्यक्त करणाèया टिप्पण्या या कलमान्वये गुन्हा ठरत नाही.

This Post Has One Comment

Leave a Reply