भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ३ :
सर्वसाधारण अपवाद :
कलम १४ :
विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या अथवा चूकभुलीमुळे स्वत:ला विधित: बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेले कृती :
जी व्यक्ती एखादी गोष्ट (कृत्य) करण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेली) आहे किंवा जी व्यक्ती ती गोष्ट करण्यास आपण विधित: बद्ध आहोत असे परंतु विधिविषयक (कायद्याची) चूकभूलीमुळे नव्हे तर तथ्यविषयक (परिस्थितीविषयक वस्तुस्थितीच्या) चूकभुलीमुळे सद्भावपूर्वक समजते अशा व्यक्तीने केलेली ती गोष्ट (कृत्य) ही अपराध होत नाही.
उदाहरणे :
(a) क) (क) हा सैनिक विधिविहित समादेशांना धरुन त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरुन जमावावर गोळीबार करतो. (क) ने काहीही अपराध केलेला नाही.
(b) ख) न्यायालयाचा अधिकारी (क) याला त्या न्यायालयाने (म) ला अटक करण्याचा आदेश दिलेला असता, यथायोग्य चौकशी केल्यानंतर, तो (य) ला (म) समजून अटक करतो. (क) ने काहीही अपराध केलेला नाही.
Pingback: Ipc कलम ७६ : विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेला) असलेल्या..