भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १३ :
पूर्वी दोषसिद्धी (पूर्वशिक्षा) झाली असता त्याखालील विवक्षित अपराधांबद्दल वाढीव शिक्षा :
जो कोणी या संहितेमधील प्रकरण १० किंवा १७ याखालील तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल भारतामधील एखाद्या न्यायालयाने, त्यास दोषी ठरविल्यानंतर प्रकरण १० किंवा १७ या दोहोंपैकी कोणत्याही प्रकरणाखाली तितक्याच मुदतीच्या, त्याच प्रकारच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला कोणताही अपराध नंतर केल्यामुळे दोषी होईल, तो अशा नंतरच्या प्रत्येक अपराधाबद्दल आजन्म कारावास किंवा दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या दोन्हीं पैकी कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासास पात्र ठरेल.
Pingback: Ipc कलम ७५ : १.(प्रकरण १२ किंवा १७ याखाली पूर्वी दोषसिद्धी..