Bns 2023 कलम १११ : संगठित गुन्हेगारी (अपराध) :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १११ :
संगठित गुन्हेगारी (अपराध) :
कलम : १११ (२) (क) (अ)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : संगठित गुन्हेगारीचा अपराध, परिणाम स्वरुप कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु होणे.
शिक्षा : मृत्यु किंवा आजीवन कारावास आणि द्रव्यदंड जो १० लाख रुपयांपेक्षा कमी नसेल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १११ (२) (ख) (ब)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही अन्य बाबतीत.
शिक्षा : कारावास जो ५ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असेल आणि द्रव्यदंड जो ५ लाख रुपयांपेक्षा कमी नसेल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १११ (३)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : संगठित गुन्हेगारीचा अपराध करण्याचे अपप्रेरण, प्रयत्न, षडयंत्र करणे किंवा जाणीवपूर्वक सुकर बनविणे.
शिक्षा : कारावास जो ५ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असेल आणि द्रव्यदंड जो ५ लाख रुपयांपेक्षा कमी नसेल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १११ (४)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : संगठित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असणे.
शिक्षा : कारावास जो ५ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असेल आणि द्रव्यदंड जो ५ लाख रुपयांपेक्षा कमी नसेल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १११ (५)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : उद्देशपूर्वक, संगठीत गुन्हेगारीचा अपराध केला आहे अशा व्यक्तीस आसरा देणे किंवा लपवून ठेवणे.
शिक्षा : कारावास जो ३ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असेल आणि द्रव्यदंड जो ५ लाख रुपयांपेक्षा कमी नसेल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १११ (६)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : संघठित अपराधातून उत्पन्न किंवा प्राप्त झालेली संपत्ति धारण (संपादन) करणे.
शिक्षा : कारावास जो ३ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असेल आणि द्रव्यदंड जो २ लाख रुपयांपेक्षा कमी नसेल.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १११ (७)
अपराध का वर्गीकरण :
अपराध : संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याच्या वतीने संपत्ति धारण (संपादन) करणे.
शिक्षा : कारावास जो ३ वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु १० वर्षापर्यंत असेल आणि १ लाख रुपये द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) एखाद्या व्यक्तिने अवैध मार्गांनी आर्थिक लाभ मिळविण्याच्या किंवा स्वत:साठी किंवा कोणत्याही अन्य व्यक्तिसाठी गैरवाजवी आर्थिक किंवा इतर फायदा मिळविण्याच्या किंवा उठार करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक तर संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे कार्य करणाèया व्यक्तींच्या गटांच्या प्रयत्नांद्वारे, हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा किंवा जबरदस्ती करुन किंवा अन्य बेकायदेशीर मार्गांनी चालू ठेवलेले काणतेही बेकायदेशीर कृत्य, ज्याच्या अर्तगत अपहरण, डकैती, वाहन चोरी, खंडणी, जमीन बळकावणे, संविदा वध (कॉन्ट्रॅक्ट किलींग), आर्थिक अपराध, गंभीर परिणामांसह सायबर-गुन्हे, लोकांची तस्करी, औषधे, बेकायदेशीर वस्तु किंवा सेवा आणि शस्त्रांचा र्दुव्यापार, वेश्याव्यवसाय किंवा खंडणीसाठी मानवी तस्करी यांचा समावेश आहे, संगठित गुन्हेगारी (अपराध) असा आहे.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनासाठी,-
एक) संगठित गुन्हेगारी संघटना म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींचा समुह अभिप्रेत आहे, जो एक संघटना किंवा टोळी स्वरुपात ऐकट्याने किंवा संयुक्तपणे मिळून, कोणत्याही चालू ठेवलेल्या बेकायदेशी कृत्यामध्ये अंतवर्लित आहेत;
दोन) चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ, ज्याच्या बाबतीत मागील दहा वर्षाच्या कालावधीत, एकापेक्षा अधिक आरोपपत्रे सक्षम न्यायालयापुढे दाखल करण्यात आलेली असतील अणि अशा अपराधाची त्या न्यायालयाने दखल घेतलेली असेल असे, संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा अशा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हाती घेतलेले, तीन किंवा त्याहून अधिक वर्षाच्या कारावासाची शिक्षा असलेला दखलपात्र अपराध असून कायद्याद्वारे प्रतिषिद्ध ठरविण्यात आलेले कृत्य, असा आहे;
तीन) आर्थिक गुन्ह्यांमध्ये फौजदारी न्यास भंग, बनावटीकरण, चलन नोट, बैंक नोय आणि सरकारी स्टँपचे बनावटीकरण, हवाला संव्यवहार, मोठ्या प्रमाणावर विपणन फसवणूक किंवा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बहु-स्तरीय विपणन योजना चालविणे किंवा कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था किंवा इतर कोणत्याही संस्था किंवा संस्थेची फसवणूक करण्याच्या हतेुणे कृत्य करणे, यांचा समावेश आहे;
२) जो कोणी संगठित गुन्हेगारीचा अपराध करील,-
(a) क) (अ) जर अशा अपराधामुळे कोणत्याही व्यक्तिचा मृत्यु झाला असेल तर, तो मृत्युदंडांची किंवा जन्मठेपेची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि दहा लाख रुपयांपेक्षा कमी नसेल अशा द्रव्यदंडास पात्र ठरेल;
(b) ख) (ब) कोणत्याही अन्य बाबतीत, पाच वर्षाहून कमी नसेल परंतु, आजीवन कारवासा पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल अशा द्रव्यदंडास पात्र ठरेल;
३) जो कोणी एखादा संघटित गुन्हा किंवा संघटित गुन्हाचा अपप्रेरण, कृत्य करण्याचा कट करील किंवा प्रयत्न करील किंवा त्याचे समर्थन करील, त्यात सहाय्य करील किंवा ते सुकर करील किंवा संगठित गुन्हाच्या कोणत्याही प्रारंभिक कार्यात सहभागी होईल, तो पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल अशा द्रव्यदंडास पात्र ठरेल.
४) संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य असणारी कोणतीही व्यक्ति पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल अशा द्रव्यदंडास पात्र ठरेल.
५) जो कोणी व्यक्ती उद्देशपूर्वक, संगठीत गुन्हेगारीचा अपराध केला आहे अशा व्यक्तीस आसरा देईल किंवा लपवून ठेवील तो तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि पाच लाखापेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल :
परंतु, ज्या प्रकरणांमध्ये गुन्हेगाराच्या पती-पत्नीने आश्रय देणे किंवा लपविण्याचे कृत्य केले आहे अशा प्रकरणांमध्ये हे पोटकलम लागू होणार नाही.
६) जो कोणी संघटित गुन्हा करुन मिळालेली किंवा प्राप्त झालेली किंवा संघटित गुन्हेगारी संघटनेच्या किंवा संघटित गुन्हेगारी च्या माध्यामतून संपादन करण्यात आलेली आहे अशी कोणतीही मालमत्ता ताब्यात घेइल (धारण करील), तो तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु अजीवन कारावासापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि दोन लाख रुपयांपैक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
७) जर कोणतीही व्यक्ति, संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याच्या वतीने ती जिच्याबाबतीत समाधानकारकपणे हिशेब देऊ शकत नसेल अशी जंगम किंवा स्थावर संपत्ती जवळ बाळगीत असेल ती, तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा केली जाण्यास पात्र ठरेल आणि एक लाख रुपयांपैक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल आणि अशी संपत्ती जप्त व समपऱ्हत केली जाण्यास ही पात्र असेल.

Leave a Reply