Site icon Ajinkya Innovations

Arms act कलम ७ : मनाई केलेली शस्त्रे किंवा दारूगोळा यांचे संपादन किंवा कब्जा अथवा निर्मिती किंवा व्रिकी यांस मनाई :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ७ :
मनाई केलेली शस्त्रे किंवा दारूगोळा यांचे संपादन किंवा कब्जा अथवा निर्मिती किंवा व्रिकी यांस मनाई :
कोणत्याही व्यक्तीला, कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेला दारूगोळा –
(a)क)(अ) संपादन करणे, तो आपल्या कब्जात ठेवणे किंवा बरोबर बाळगणे, किंवा.
(b)ख)(ब) १.(यांचा वापर निर्मिती) करणे, विक्री करणे, हस्तांतरण करणे, रूपांतर करणे, दुरूस्ती करणे, चाचणी करणे किंवा तो वापरून दाखवणे, किंवा
(c)ग) (क) विक्रीसाठी मांडणे किंवा विकत देऊ करणे किंवा त्यांची विक्री हस्तांतरण, रूपांतर, दुरूस्ती, चाचणी करणे किंवा वापरून दाखवणे यासाठी तो आपल्या कब्जात ठेणे यासंबंधात.
केंद्र शासनाने तिला विशेषकरून प्राधिकृत केल्याशिवाय तसे करता येणार नाही.
——–
१. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कल म४ द्वारे निर्मिती याऐवजी (२७-५-१९८८ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version