Site icon Ajinkya Innovations

Arms act कलम ५ : शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती, विक्री इत्यादींसाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ५ :
शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती, विक्री इत्यादींसाठी लायसन :
१.(१)) कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाच्या उपबंध व त्याखाली केलेले नियम यानुसार देण्यात आलेले लायसन धारण केल्याशिवाय कोणतेही अग्निशस्त्र किंवा विहित असेल अशा वर्गापैकी किंवा वर्णनाची कोणतीही अग्निशस्त्रे किंवा कोणताही दारूगोळा-
(a)क)(अ) २.(यांचा वापर, ३.(निर्मिती, प्राप्ती,हस्तगत)), विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती किंवा चाचणी करता येणार नाही किंवा वापरून दाखवता येणार नाही, अथवा.
(b)ख)(ब) विक्रीकरिता मांडता येणार नाही किंवा विकत देऊ करता येणार नाही किंवा हस्तांतरित करता येणार नाही किंवा त्याची विक्री, हस्तांतरण, रूपांतरण, दुरूस्ती, चाचणी करण्यासाठी किंवा वापरून दाखवण्यासाठी स्वत:च्या कब्जात ठेवता येणार नाही.
४.(***)
५.(२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, याबाबतचे लायसन धारण न करता एखादी व्यक्ती आपल्या खाजगी वापराकरिता कायदेशीरपणे स्वत:च्या कब्जात ठेवलेली कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा, या अधिनियमाच्या किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याच्या आधारे जी व्यक्ती अशी शस्त्रे किंवा दारूगोळा स्वत:च्या कब्जात ठेवण्यास हक्कदार असेल अथवा व्यक्तीला ती कब्जात असण्यास या अधिनियमाद्वारे किंवा अशा अन्य कायद्याद्वारे मनाई केली नसेल अशा अन्य व्यक्तीस विकू शकेल किंवा तिच्याकडे हस्तांतरित करू शकेल :
परंतु, कलम ३ अन्वये ज्यांच्यासंबंधात लायसनाची आवश्यकता आहे अशी कोणतीही अग्निशस्त्रे किंवा दारूगोळा आणि कलम ४ अन्वये ज्यांच्यासंबंधात लायसनाची आवश्यकता आहे अशी कोणतीही शस्त्रे कोणतीही व्यक्ती,
(a)क)(अ) अधिकरिता असलेल्या जिल्हा दंडाधिकाऱ्यास, किंवा सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यास, अशी अग्निशस्त्रे, दारूगोळा किंवा इतर शस्त्रे विकण्याचा किंवा त्याचे हस्तांतरण करण्याचा आपला उद्देश आणि अशी अग्निास्त्रे, दारूगोळा किंवा इतर शस्त्रे तो ज्या व्यक्तीला विकू किंवा हस्तांरित करू इच्छितो अशा व्यक्तीचे नाव व पत्ता पळविल्याशिवाय, आणि
(b)ख)(ब) अशी माहिती कळविण्यात आल्यानंतर किमान पंचेचाळीस दिवसांचा कालावधी संपल्याशिवाय,
विकू शकणार नाही).
———–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ४ द्वारे (२२-६-१९८३ पासून) नवीन क्रमांक देण्यात आला.
२. १९८८ चा अधिनियम क्रमांक ४२ याच्या कलम ३ द्वारे यांची निर्मिती याऐवजी (१-९-१९८८ पासून) समाविष्ट केले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ४८ याच्या कलम ४ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) (निर्मिती) शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ४ द्वारे (२२-६-१९८३ पासून) परंतुक गाळले.
५. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ४ द्वारे (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट केले.

Exit mobile version