Site icon Ajinkya Innovations

Arms act कलम ४ : विवक्षित प्रकरणी विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४ :
विवक्षित प्रकरणी विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :
एखाद्या क्षेत्रातील प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, अग्निशस्त्रांव्यतिरिक्त अन्य शस्त्रे संपादन करणे, ती कब्जात ठेवणे किंवा बरोबर बाळगणे याही गोष्टींचे विनियमन करणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक किंवा समयोचित आहे असे जर केंद्र शासनाचे मत असल्यास, ते शासकीय राजपत्रातील अधिसूचनेत विनिर्दिष्ट केले जाईल त्या क्षेत्रास हे कलम लागू होईल असा निदेश देऊ शकेल, आणि त्यानंतर कोणतीही व्यक्ती या अधिनियमाचे उपबंध व त्याखाली केलेले नियम यांच्यानुसार या संबंधात दिलेले लायसन तिने धारण केले नसल्यास त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वर्गाची किंवा वर्णनाची शस्त्रे त्या क्षेत्रामध्ये संपादन करणार नाही, ती कब्जात ठेवणार नाही किंवा बरोबर बाळगणार नाही.

Exit mobile version