Site icon Ajinkya Innovations

Arms act कलम ३४ : शस्त्रे वखारीत ठेवण्यासाठी केंद्र शासनाची मंजुरी :

शस्त्र अधिनियम १९५९
प्रकरण ६ :
संकीर्ण :
कलम ३४ :
शस्त्रे वखारीत ठेवण्यासाठी केंद्र शासनाची मंजुरी :
१.(सीमाशुल्क अधिनियम, १९६२ (१९६२ चा ५२)) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, त्या अधिनियमाच्या २.(कलम ५८ खाली) लायसन मिळालेल्या कोणत्याही वखारीत केंद्र शासनाच्या संमतीवाचून कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा ठेवण्यास येणार नाहीत.
———
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १३ द्वारा सागर सीमाशुल्क अधिनियम १९७८ या मजकुराऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १३ द्वारा कलम १६ ऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version