Site icon Ajinkya Innovations

Arms act कलम २४क(अ) : १.(शांतता भंग झालेली क्षेत्रे, इत्यादींमध्ये अधिसूचित शस्त्रे कब्जात बाळगण्यास मनाई :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम २४क(अ) :
१.(शांतता भंग झालेली क्षेत्रे, इत्यादींमध्ये अधिसूचित शस्त्रे कब्जात बाळगण्यास मनाई :
१) एखाद्या क्षेत्रातील सार्वजनिक शांततेचा आणि प्रशांततेचा मोठ्या प्रमाणात भंग झाला आहे किंवा अशी शांतता भंग पावण्याचा धोका निकट येऊन ठेपला आहे याबाबत आणि अशा क्षेत्रात शस्त्रांच्या वापराचा अंतर्भावा असलेल्या अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी तसे करणे आवश्यक किंवा समायोचित आहे याबाबत केंद्र शासनाची खात्री झाली असेल अशा बाबतीत, ते शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे :
(a)क)(अ) अशा क्षेत्राच्या मर्यादा विनिर्दिष्ट करू शकेल ;
(b)ख)(ब) अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेला कालावधी (असा कालावधी म्हणजे ती अधिसूचना शासकीय राजपत्रतात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतरच्या चौथ्या दिवसाच्या आधीची नाही अशा तारखेपासून सूरू होणारा कालावदी असेल) सुरू होण्यापूर्वी, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात आले असेल अशा वर्णनाची कोणतीही शस्त्रे (याप्रमाणे विनिर्दिष्ट केलेल्या शस्त्रांना या कलमात यापुढे अधिसूचित शस्त्रे म्हणून निर्दिष्ट केले आहे) कब्जात बाळगणाऱ्या अशा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने अशी शस्त्रे, अशा प्रारंभापूर्वी कलम २१ च्या उपबंधानुसार निक्षिप्त केली पाहिजेत. आणि या अधिनियमाच्या इतर कोणत्याही उपबंधात (कलम ४१ वगळून) किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, अशा व्यक्तीकडे असलेला कोणत्याही अधिसूचित शस्त्रांचा कब्जा हा या प्रयोजनार्थ कायदेशीर राहिला नसल्याचे मानण्यात यावे असे निदेशित करू शकेल;
(c)ग) (क)अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीच्या प्रारंभापासून आणि तो समाप्त होईपर्यंत अशा कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही अधिसूचित शस्त्रे कोणत्याही व्यक्तीने स्वत:च्या कब्जात ठेवणे हे कायदेशीर ठरणार नाही असे अधिसूचित करू शकेल.
(d)घ) (ड)अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल असा केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अखत्याराखालील कोणत्याही अधिकाऱ्याला,-
एक) अशा क्षेत्रात असलेल्या किंवा त्यामधून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे अथवा त्या क्षेत्रामधील कोणत्याही परिवास्तूत अथवा त्या क्षेत्रामध्ये असलेल्या किंवा त्यामधून जाणाऱ्या कोणत्याही प्राण्याजवळ किंवा जलयानात किंवा वाहनात किंवा कोणत्याही स्वरूपाच्या वाहतुकीच्या अन्य साधनात अथवा त्या क्षेत्रामध्ये असलेल्या कोणत्याही पात्रात किंवा कोणत्याही स्वरूपाच्या इतर कोणत्याही आधानकात कोणतीही अधिसूचित शस्त्रे लपवण्यात आलेली आहेत असे मानावयाला त्याला कारण असल्यास, अधिसूचनेत विनिर्दिष्ट केला असेल अशा कलावाधीत कोणत्याही वेळी अशी व्यक्ती किंवा अशी परिवास्तू किंवा असा प्राणी किंवा असे जलायन, वाहन किंवा वाहतुकीचे अन्य साधन किंवा असे पात्र किंवा आधानक यांची झडती घेण्यासाठी;
दोन) अशा क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात असलेली किंवा पोटकलम (एक) खालील झडतीत सापडलेली अधिसूचित शस्त्रे, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधीत कोणत्याही वेळी हस्तगतं करून अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या कालावधीत ती अडकवून ठेवण्यासाठी; प्राधिकृत करू शकेल.
२) कोणत्याही क्षेत्राच्या संबंधात पोटकलम (१) खाली काढलेला अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करावयाचा कालावधी प्रथमत: नव्वद दिवसांपेक्षा जास्त असणार नाही, मात्र अशा क्षेत्रात पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे सार्वजनिक शांततेचा आणि प्रशांततेचा असा भंग किंवा त्याचा निकटवर्ती धोका चालू आहे आणि अशा क्षेत्रात शस्त्रांच्या वापराचा अंतर्भात असलेल्या अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी तसे आवश्यक किंवा समयोचित आहे असे केंद्र शासनाचे मत असल्यास, ते शासन असा कालावधी वेळोवेळी, कोणत्याही एका वेळी जास्तीत जास्त नव्वद दिवसांच्या कोणत्याही कालावधीने वाढविण्यासाठी अशी अधिसूचना विशोधित करू शकेल.
३) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामधील झडती आणि अभिग्रहण यांच्यासंबंधीचे उपबंध, पोटकलम (१) खाली केलेल्या कोणत्याही झडतीला किंवा अभिग्रहणाला शक्य तितपत लागू होतील.
४) या कलमाच्या प्रयोजनासाठी, –
(a)क)(अ) शस्त्रे यामध्ये दारूगोळ्याचा समावेश होतो;
(b)ख)(ब) मूलत: पोटकलम १) खाली काढलेल्या अधिसूचनेत विनर्दिष्ट केलेला कोणताही कालावधी पोटकलम २) अन्वये वाढविण्यात आला असेल अशा बाबतीत, अशा अधिसूचनेच्या संबंधात पोटकलम १) मधील,अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेला कालावधी हा निर्देश म्हणजे अशा प्रकारे वाढविण्यात आलेल्या कालावधीचा निर्देश होय असा त्याचा अर्थ लावण्यात येईल.)
——–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ७ द्वारा (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version