शस्त्र अधिनियम १९५९
कलम ४१ :
सूट देण्याची शक्ती :
जर केंद्र शासनाच्या मते तसे करणे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक किंवा समायोचित असल्यास, ते शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे व अधिसूचनेत ते विहित करील अशा कोणत्याही शर्ती असल्यास, त्यांच्या अधीनतेने,-
(a)क)(अ) या अधिनियमाच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही उपबंधांच्या प्रवर्तनापासून, १.(कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तिवर्गास, (एकतर सरसकट किंवा अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा वर्णनांच्या शस्त्रांच्या आणि दारूगोळ्यांच्या संबंधात) सूट देऊ शकेल), किंवा कोणत्याही वर्णनाचे शस्त्रे किंवा दारूगोळा वगळू शकेल, किंवा भारताचा कोणताही भाग मुक्त करू शकेल; आणि
(b)ख)(ब) कितीही वेळा अशी कोणतीही अधिसूचना रद्द करू शकेल आणि पुन्हा तशाच अधिसूचनेद्वारे ती व्यक्ती किंवा तो व्यक्तीवर्ग किंवा त्या वर्णनाची शस्त्रे व दारूगोळा किंवा भारताचा तो भाग यांना अशा उपबंधाच्या प्रवर्तनास अधीन ठरवू शकेल.
——–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम १५ द्वारा मूळ मजकुराऐवजी (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.