शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३२ :
अधिहरण करण्याची शक्ती :
१) कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा यांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल या अधिनियमानुसार तिला दोषी ठरवण्यात आले असेल तेव्हा, अशी शस्त्रे किंवा दारूगोळा संपूर्णपणे किंवा त्यांचा कोणताही भाग, आणि ज्यामध्ये ती शस्त्रे किंवा दारूगोळा आहे असे किंवा ती लपवण्यासाठी वापरलेले असे कोणतेही जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे अन्य साधन व असे कोणतेही पात्र किंवा वस्तू यांचे अधिहरण करण्याबाबत आणखी दोषसिद्धी करणाऱ्या न्यायालयाच्या विवेकाधीन असेल :
परंतु अपिलान्ती किंवा अन्यथा दोषसिद्धी रद्द ठरवण्यात आली तर, अधिहरण आदेश शून्य होईल.
२) हा अधिहरण आदेश अपील न्यायालय किंवा पुनरीक्षण करण्याच्या आपल्या शक्तींच्या वापर करणारे उच्च न्यायालयदेखील देऊ शकेल.