शस्त्र अधिनियम १९५९
कलम २६ :
१.(चोरटे व्यतिक्रमण:
१) जो कोणी कलमे ३,४,१० किंवा १२ यांच्या उपबंधापैकी कोणत्याही उपबंधाचे व्यतिक्रमण करून अशा रीतीने एखादी कृती करील की, ज्यायोगे अशी कृती कोणत्याही लोकसेवकाला अथवा रेल्वेगाडी, वायुमान, जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे कोणतेही साधन यांच्या ठिकाणी नेमलेल्या किंवा काम करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कळू नये असा उद्देश दिसून येईल तो, ज्याची मुदत कमीत कमी सहा महिने जास्तीत जास्त सात वर्षे असू शकेल, असा कारावासास आणि तसेच द्रव्य दंडास पात्र होईल.
२) जो कोणी, कलमे ५,६,७ किंवा ११ यांच्या उपबंधापैकी कोणत्याही उपबंधाचे व्यतिक्रमण करून अशा रीतीने एखादी कृती करील की, ज्यायोगे अशी कृती कोणत्याही लोकसेवकाला अथवा रेल्वे गाडी, वायुयान, जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे अन्य कोणतेही साधन यांच्या ठिकाणी नेमलेल्या किंवा काम करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते कळू नये असा उद्देश दिसून येईल तो, ज्याची मुदत कमीत कमी पाच वर्षे असेल परंतु, जास्तीत जास्त दहा वर्षे असू शकेल अशा करावासास आणि तसेच द्रव्यदंडासही पात्र होईल.
३) जो कोणी, कलम २२ खाली कोणतीही झडती घेण्यात येत असताना कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा लपवील किंवा लपविण्याचा प्रयत्न करील तो, दहा वर्षेपर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासास, आणि तसेच द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ९ द्वारा (२२-६-१९८३ पासून) मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.